पुणे ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका; मूळ रकमेवर ९ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:01 PM2017-12-26T12:01:00+5:302017-12-26T12:10:21+5:30

ग्राहकाला कल्पना न दिलेल्या अटी, शर्ती समोर ठेवून रुग्णालयाच्या बिलाची अर्धवट रक्कम देऊन ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला.

Pune consumer court bump insurance company; An order to pay 9% interest on the base amount | पुणे ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका; मूळ रकमेवर ९ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

पुणे ग्राहक मंचाचा विमा कंपनीला दणका; मूळ रकमेवर ९ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देबिलाची ५०, ७१० रुपये एवढी रक्कम दावा दाखल केल्यापासून ९ टक्के व्याजाने देण्याचे आदेशसदाशिव पेठ येथील दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्याविरोधात ग्राहक मंचात दावा दाखल

पुणे : ग्राहकाला कल्पना न दिलेल्या अटी, शर्ती समोर ठेवून रुग्णालयाच्या बिलाची अर्धवट रक्कम देऊन ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला. त्याचप्रमाणे बिलाची ५० हजार ७१० रुपये एवढी रक्कम दावा दाखल केल्यापासून ९  टक्के व्याजाने देण्याचे आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य ओंकार पाटील, क्षितिजा कुलकर्णी यांनी दिले.
गुरव यांनी हा खर्च मिळण्यासाठी विमा कंपनीकडे कागदपत्रे सादर केली. मात्र, विमा कंपनीने ३१ हजार ५०० रुपयांचा क्लेम मंजूर केला. अटी, शर्तीनुसार अर्धाच क्लेम मंजूर होतोय, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, विमाधारकाला पॉलिसी देताना अटी, शर्तीबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यांना केवळ विम्याची कागदपत्रे देण्यात आली होती. अटी, शर्तींबाबत विमा कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. 
तसेच उर्वरित ५० हजार ७१० रुपये मिळावेत, यासाठी शशिकांत यांच्या कंपनीने ग्राहक मंचात धाव घेतली. उर्वरित रक्कम १० टक्के व्याजाने, शारीरिक, मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये मिळावी, अशी मागणी केली. कंपनीने या मागणीस मंचात विरोध केला. मंचाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचाने गुरव यांना उर्वरित रक्कम ९ टक्के व्याजाने परत करण्याचा आणि या प्रकरणी मानसिक त्रास झाल्याने वेगळे ५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. 
सदाशिव पेठ येथील दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्याविरोधात पिंपरीच्या ए. टी. ई. वेल्डिंग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अ‍ॅण्ड आॅटोमेशन प्रा. लि. ने ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. कंपनीने शशिकांत गुरव कर्मचारी २३ फेब्रुवारी २०१५ रोजी आजारी पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. गुरव यांचा ३० मार्च २०१४ ते २९ मार्च २०१५ या कालावधीसाठी मेडिक्लेम विमा काढला होता. उपचारादरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना ८२ हजार २१० रुपये खर्च आला.

Web Title: Pune consumer court bump insurance company; An order to pay 9% interest on the base amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे