Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:20 PM2022-01-03T14:20:18+5:302022-01-03T14:20:28+5:30

पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत बैठक होणार असून अजून नवीन काही नियम करता येतील याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे

In pune corona affected people even after taking both doses Restrictions will have to be tightened said murlidhar mohol | Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

Next

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सत्तावीस डिसेंबरपासून हे दिसू लागले आहे. त्यापैकी ८० ते ८५ टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतलेले आहेत. पण या बाधित लोकांमध्ये अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. तरीही प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. पण हॉटेल विमानतळ, याठिकाणी नियम पाळले जात नाहीत. काही ठिकाणी हलगर्जीपणा होत असल्याने पुणे शहरात निर्बंध कडक करावे लागतील. असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

उद्या पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत बैठक होणार असून अजून नवीन काही नियम करता येतील याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. महापालिकेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. 

मोहोळ म्हणाले, गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. याचा आढावा आम्ही घेतला. २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान शहरात चौपट रुग्णवाढ झाली आहे. त्यामध्ये जवळपास रोज ८० ते ८५ टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोना बाधित आहे. त्यांना सौम्य लक्षण असली तरी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना कोरोना होतोय. त्यामुळे सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे.  २५०० कोरोना रुग्णांपैकी ३४६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. बाकी नॉर्मल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

प्रशासन सज्ज 

महापालिकेच्या दवाखान्यात ४ हजार रेमडीसीव्हीर शिल्लक आहेत. तर १८०० बेड ९५०० लिटर पर मिनिटं ऑक्सिजन तयार होतोय. नऊ ठिकाणी ऑक्सिजन साठा तयार होतोय. जम्बो हॉस्पिटलमध्ये ही तयारी झाली आहे. सर्व तयारी करायचं झालातर आठवड्यातही पूर्ण होऊ शकते. 

राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद 

पुणे शहरात काल ३६, पिंपरी चिंचवडमध्ये ८ तर पुणे ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे शहरात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६ आणि पुणे ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत. ५१० पैकी यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेने वाढवली चाचण्यांची संख्या

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग जास्त आहे. परंतु, लक्षणेविरहित असल्याने काेणत्याही प्रकारे अनावश्यक भीती न बाळगता रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. शहरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार ५१४ झाली आहे. २६ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान शहरात ४९,५०५ चाचण्या झाल्या. यापैकी २२४८ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. आठ दिवसांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: In pune corona affected people even after taking both doses Restrictions will have to be tightened said murlidhar mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.