Pune Corona News : पुणे शहरात गुरूवारी २१५ नवे रुग्ण; तर १६१ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:57 PM2021-09-16T21:57:53+5:302021-09-16T21:58:00+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या, तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू
पुणे : शहरात गुरूवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४२० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.२८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ९०८ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७६ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ६२ हजार १३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ८८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८७ हजार ९८४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९९० जणांचा मृत्यू झाला आहे.
भवानी पेठेत एकही नवा रूग्ण नाही
शहरात दिवसभरात २१५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असताना, यापैकी एकही जण भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील म्हणजे दाट लोकवस्ती भागातील नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वांधिक नवे कोरोनाबाधित कोथरूड-बावधान येथे ३१, हडपसर-मुंढवा येथे २७, नगररोड- वडगावशेरी येथे २४, औंध बाणेर येथे २२, धनकवडी-सहकारनगर येथे १८, सिंहगड रोड येथे १७, येरवडा-कळस-धानोरी व वारजे कर्वेनगर येथे प्रत्येकी १६, ढोले पाटील रोड येथे १३, बिबवेवाडी येथे १०, शिवाजीनगर-घोलेरोड येथे ७, कसबा-विश्रामबागवाडा येथे ५ व वानवडी रामटेकडी येथे ३ रूग्ण आढळून आले आहेत.