Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 17:52 IST2021-12-19T17:52:04+5:302021-12-19T17:52:54+5:30
शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे

Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे. दिवसभरात ६४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या आजमितीला ८७४ इतकी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात उपचार घेणाऱ्या शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आज शहरातील एकही कोरोनाबाधित दगावलेला नाही. विविध रुग्णालयात सध्या ८३ गंभीर रुग्णांवर तर ६५ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत ३७ लाख ९३ हजार ४६६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील ५ लाख ८ हजार २९० जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ९८ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात ९ हजार १०९ जणांचा मृत्यू झाला आहे.