Pune Corona News : अबब! पुणे जिल्ह्यात बुधवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ; ८ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:37 PM2021-03-31T21:37:36+5:302021-03-31T21:37:43+5:30

पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारापर्यंत

Pune Corona News: Pune district witnessed the highest number of outbreaks on Wednesday; 8 thousand 605 new corona affected | Pune Corona News : अबब! पुणे जिल्ह्यात बुधवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ; ८ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित

Pune Corona News : अबब! पुणे जिल्ह्यात बुधवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ; ८ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ झालेली पाहायला मिळाली.तब्बल ८ हजार ६०५ नवे  कोरोनाबाधित आढळले आहे.तर  जवळपास ५ हजार ७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

पुणे शहरात बुधवारी ४ हजार ४५८ तर पिंपरीत २ हजार २८८ रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार ३७४ तर पिंपरीत १४१० जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९७४ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६२ हजार ६९७ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५ लाख ३४ हजार ४११ झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १६ हजार १५५ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४५ हजार ७५४ झाली आहे. जिल्ह्यात २६ हजार १२३ रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

......

शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारापर्यंत

पुणे शहरातील गेली दोन दिवस अडीच-साडेतीन हजारापर्यंत आलेली कोरोनाबाधितांची वाढ बुधवारी पुन्हा साडेचार हजाराच्या जवळ पोहचली आहे. आज ४ हजार ४५८ नवे रूग्ण आढळून आले असून, दिवसभरात १६ हजार ४४६ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २७.१० टक्के इतकी आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार १८८ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ७९९ रूग्ण हे गंभीर आहेत. तर दुसरीकडे ३ हजार ३७४ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत.आज दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ११ जण पुण्याबाहेरील आहेत़  शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ३३ हजार ८५८ इतकी झाली आहे.

शहरात आजपर्यंत १५ लाख ३० हजार ३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६९ हजार ३४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३० हजार १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३०२ इतकी झाली आहे.

==========================

Web Title: Pune Corona News: Pune district witnessed the highest number of outbreaks on Wednesday; 8 thousand 605 new corona affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.