Pune Corona News: वा क्या बात है! रुग्णसंख्येत कमालीची घट, पुरंदरमध्ये काल फक्त ६९ कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:39 AM2021-05-12T10:39:33+5:302021-05-12T10:40:15+5:30
संशयितांमध्ये बाधितांचे प्रमाण कमी
नीरा: पुरंदर तालुक्यातही मागच्या महिन्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागली होती. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेकांना जीवही गमवावा लागला. अशा परिस्थितीत प्रशासनाने लॉकडाऊनबाबत कठोर पाऊले उचलली. त्यामुळे सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील जेजुरी, नीरा, वाल्हे, माळशिरस येथील शासकीय लँबमध्ये काल १२९ संशयितांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी पैकी ३६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तर जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ८९ संशयीतांची आर.टी.- पी.सी.आर. चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ३३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात मंगळवारी फक्त ६९ रुग्णांची नोंद झाली आहे.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ९१ संशयीत रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात आली. यापैकी ३३ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. नायगाव येथील ६, जेजुरी ४, भिवंडी ३, सासवड, नाझरे, साकुर्डे, तोंडल, वाळुंज येथील प्रत्येकी २, माळशिरस, वाल्हे, वाघापूर, मांडकी, पांगारे, वीर, येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मोराळवाडी येथील ३, मुर्टी येथील १ रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ग्रामीण रुग्णालयात ८९ संशयीतांची आर.टी.- पी.सी.आर. चाचणी घेण्यात आली. त्यापैकी पैकी ३३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जेजुरी ७, मावडी ४, कोळविहीरे, नीरा, वाळुंज प्रत्येकी २, गुळुंचे, नाझरे, यादववाडी, वाल्हे, साकुर्डे, राजेवाडी, भोसलेवाडी, पिसर्वे प्रत्येकी १, तालुक्या बाहेरचे बारामतीच्या जोगवडी ४, मोराळवाडी २, तर हडपसर १ एवढ्या रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत नीरा, वाल्हे, माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३८ संशयीत रुग्णांची अँटीजेन चाचणी तपासण्यात आली. नीरा, वाल्हे, माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७२ संशयीत रुग्णांची अँटीजेन चाचणी तपासण्यात आली.त्यापैकी ११ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.