Pune Corona Update: पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांनी केली कोरोना टेस्ट; चाचण्यांचा आकडा ४० लाखांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 07:55 PM2022-01-11T19:55:31+5:302022-01-11T19:56:07+5:30

सदर चाचण्यांमध्ये ५ लाख ३२ हजार ५६१ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी ५ लाख ३ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

Pune Corona Update Corona test performed by more citizens than the total population of Pune The number of tests is more than 40 lakhs | Pune Corona Update: पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांनी केली कोरोना टेस्ट; चाचण्यांचा आकडा ४० लाखांच्या पुढे

Pune Corona Update: पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांनी केली कोरोना टेस्ट; चाचण्यांचा आकडा ४० लाखांच्या पुढे

Next

पुणे : शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये आजपर्यंत (दि़११ जानेवारी) दोन वर्षांत एकूण ४० लाख ७५ हजार ३ जणांनी म्हणजेच, पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त (सन २०११ च्या जनगणनेपेक्षा) नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे.

सदर चाचण्यांमध्ये ५ लाख ३२ हजार ५६१ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी ५ लाख ३ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १३० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शहरात १४ हजार ९८३ जणांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असून, यापैकी ३ हजार ४५९ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे़ तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २३ टक्के इतकी झाली आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एक जण पुण्याबाहेरील आहे.  दिवसभरात १ हजार १०४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

Web Title: Pune Corona Update Corona test performed by more citizens than the total population of Pune The number of tests is more than 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.