Pune Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी २१८ नवे कोरोनाबाधित : २३९ जणांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:23 PM2021-09-07T20:23:45+5:302021-09-07T20:24:02+5:30
शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २११ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९४ इतकी आहे.
पुणे : शहरात मंगळवारी २१८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ४२५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.३९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार १४१ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २११ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ९२ हजार ५६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार १५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८६ हजार ५६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९५८ जणांचा मृत्यू झाला आहे.