Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३१६ कोरोनाबाधित; तर ३२९ झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 08:12 PM2021-07-04T20:12:55+5:302021-07-04T20:13:05+5:30
पॉझिटिव्हीटी रेट अजूनही पाच टक्क्यांच्या वर, दिवसभरात ६ जणांचा मृत्यू
पुणे: शहरात रविवारी दिवसभरात ३१६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ७८३ सक्रिय रुग्ण आहेत. खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार ७३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.५ टक्के होती. दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रविवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९७ रुग्ण गंभीर असून ४३९ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ९३ हजार ६०८ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७९ हजार ७३२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६८ हजार ३३७ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६१२ जणांचा मृत्यू झाला आहे.