Pune Corona virus News: पुणे शहरात बुधवारी ५ हजार ६५१ तर पिंपरीत २,७८४ जण नवे कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 09:28 PM2021-04-07T21:28:00+5:302021-04-07T21:28:09+5:30
पुणे शहरात कोरोनाबाधितांची टक्केवारी २१. ३६ टक्के
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा बुधवारीही साडेपाच हजाराच्या पुढे राहिला असून, आज केलेल्या २६ हजार १२० तपासणीमध्ये ५ हजार ६५१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी २१़६३ टक्के इतकी आहे.
शहरात आज दिवसभरात तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १३ जण हे शहराबाहेरील आहेत़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही १़़८२ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ३२५ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर ९५७ रूग्ण हे गंभीर आहेत. तर आज दिवसभरात ४ हजार ३६१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४६ हजार ७१ इतका झाला आहे.
शहरात आजपर्यंत १६ लाख १९ हजार ८५६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ५ हजार ३७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ५३ हजार ७३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५६७ झाली आहे.
.....
चिंचवड आणि थेरगावमध्ये सर्वाधिक रुग्ण
पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. दिवसभरात सर्वाधिक रुग्ण एक हजार चिंचवड, रावेत, थेरगाव, काळेवाडी परिसरात आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेंनी कमी झाली आहे. २ हजार २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २९०० आलेली रुग्णसंख्या दोनशेंनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ८ हजार ३१९ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ४ हजार ५४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार ७४० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ४ हजार ११३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज आठ हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तुलनेत सहाशेंनी कोरोनामुक्त वाढले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३२ हजार ३८६वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार ७६८ वर गेली आहे.शहरातील १३ जणांचा बळी
कोरोनामुळे बळी गेला आहे.
..................................
१२ हजार जणांना लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. शहरातील महापालिकेच्या ५९ आणि खासगी २१ अशा एकूण ८० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात १० हजार १४० जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह १ हजार ६०८ जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाºया ११ हजार ७६० जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या २ लाख २० हजार ८५३ वर पोहोचली आहे.