Pune coronavirus vaccine : लसीकरणासाठी आता गणपती मंडळाची मदत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:41 PM2021-04-03T20:41:51+5:302021-04-03T20:51:30+5:30

एकाच दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न.

Pune coronavirus vaccine: Now Ganpati Mandal's help for vaccination. | Pune coronavirus vaccine : लसीकरणासाठी आता गणपती मंडळाची मदत.

Pune coronavirus vaccine : लसीकरणासाठी आता गणपती मंडळाची मदत.

Next

पुणे शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता शहरात जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच आता गणपती मंडळ तसेच सामाजिक संघटना आणि एनजीओची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या  माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना रुग्णालयात नेऊन लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न 'पुणे प्लॅटफॉर्म पर कोविड रिस्पॉन्स' आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे.

प्रशासनाच्या वतीने लसीकरणासाठी 'मिशन 100डेज' राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शंभर दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. एकीकडे हा प्रयत्न होत असतानाच एका दिवसात जास्तीत जास्त लसीकरण करून ही क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्याचाच भाग म्हणून सोमवारी एक लाखांहून जास्त लोकांचे लसिकरण एका दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न संपूर्ण जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे.

यासाठी आता सामाजिक संघटना आणि गणपती मंडळाच्या प्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशासन, पीपीसीआर आणि वेगवेगळ्या रुग्णालयांचे डॉक्टर यांची बैठक झाली. यामध्ये शहरातल्या 75 रुग्णालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक लसीकरण एका दिवसात करण्याचा प्रयत्न तर शासन करणार आहे. सोमवारी एक लाखाचा टारगेट ठेवण्यात आलं होतं ते वाढवून या आठवड्यात ते लाखाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

त्याविषयी बोलताना एमसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले" आत्ताच्या संकटावर लसीकरण हाच उपाय आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकांनी लसीकरण करण्यासाठी यावं यासाठी आता आम्ही सामाजिक संघटना आणि गणपती मंडळांची मदत घेणार आहोत. गणपती मंडळाच्या प्रतिनिधींची आज बैठकही यासंदर्भात घेण्यात आली. या माध्यमातूनच सोमवारी आम्ही लसीकरणाचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यासच जास्त लसींची मागणी करता येईल. लोकांनी पुढे येऊन लसीकरण करून घेणे आवश्यक आहे" 

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, "या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे".

 

 

 

Web Title: Pune coronavirus vaccine: Now Ganpati Mandal's help for vaccination.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.