पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

By राजू हिंगे | Updated: March 4, 2025 16:44 IST2025-03-04T16:39:03+5:302025-03-04T16:44:04+5:30

Pune Municipal Corporation Budget 2025: स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सविधावर भर देण्यात आला आहे.

Pune Corporation Budget Relief for Punekars No tax hike Municipal Corporation presents budget of Rs 12,618 crore | पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

PMC Budget 2025: पुणेकरावर कोणतीही कर वाढ न करणारे पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीला सादर केला. यामध्ये स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सुविधावर भर देण्यात आला आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्पीराज बी.पी., अप्पर आयुक्त महेश पाटील, वित्त व लेखाधिकारी उल्का कळसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, नगरसचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावासाठी तब्बल ६२३ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे समाविष्ट गावामध्ये पायाभुत सविधा निर्माण होणार आहे.

पुणे महापालिकेनं समान पाणीपुरवठ्याची योजना राबवली आहे. त्याचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे त्यामुळे आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचं बील मीटर प्रमाणे द्यावे लागणार आहे ⁠पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी मधील घरांचे पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता उपायुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या यांचे निराकरण केले जाणार आहे.

पुणे बजेट २०२५-२६ (Pune Budget 2025-26)
असा येणार रुपया (जमा)
वस्तू व सेवा कर : २६ टक्के
मिळकत कर : २३ टक्के
पाणी पट्टी : ५ टक्के
शासकीय अनुदान : १३ टक्के
शहर विकास चार्जेस : २३ टक्के
अमृत, स्मार्ट सिटी : २ टक्के
इतर जमा : ६ टक्के
कर्ज रोखे :२ टक्के
 
असा जाणार रुपया (खर्च)
विकासकामे व प्रकल्प : ४१ टक्के
सेवक वर्ग खर्च : २९ टक्के
वीजखर्च व दुरूस्ती : ३ टक्के
पाणी खर्च : १ टक्के
कर्ज परतफेड व व्याज : १ टक्के
वॉर्ड स्तरीय कामे : १ टक्के
पेट्रोल, देखभाल दुरूस्ती खर्च, औषधे : २१ टक्के
क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे : १ टक्के
अमृत, स्मार्ट सिटी : २ टक्के

Web Title: Pune Corporation Budget Relief for Punekars No tax hike Municipal Corporation presents budget of Rs 12,618 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.