पुण्याचे नगरसेवक इंदूरच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:54 AM2018-12-09T03:54:24+5:302018-12-09T03:54:53+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत.
पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते शहर स्वच्छता कशी ठेवायची याचा धडा गिरवणार आहेत. यासाठीच्या खर्चाचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
समितीमध्ये विषय मंजूर होण्यापूर्वीच दौºयावर येऊ इच्छिणाºया नगरसेवकांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टीप्रणीत केंद्र सरकार सन २०१६ पासून देशातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेत सलग दोन वर्षे इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रशासनानेच हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय ते यशस्वी होत नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात उल्लेखनीय काम करणाºया महापालिकेला शहर स्वच्छतेमध्ये मात्र या सर्वेक्षणात फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचे कारण नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही हेच आहे. हे कारण दूर व्हावे व नगरसेवकांनी नागरिकांना समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवावा म्हणून दौरा आहे.