पुणे: नगरसेवकाचे आॅफिस जमीनदोस्त; हडपसरमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:58 AM2017-12-20T04:58:14+5:302017-12-20T04:58:25+5:30

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाºया प्रभागात अनेक ठिकाणची अतिक्रमणे हडपसर अतिक्रमण विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केली. प्रभाग क्रमांक २६ मधील महंमदवाडी येथील मुख्य चौकातील अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली. यामध्ये हॉटेल, पत्र्याचे शेड, दुकाने, पक्की बांधकामे आदी हटविण्यात आले.

Pune: Corporator's office flattened; Hatha on encroachment in Hadapsar | पुणे: नगरसेवकाचे आॅफिस जमीनदोस्त; हडपसरमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

पुणे: नगरसेवकाचे आॅफिस जमीनदोस्त; हडपसरमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

Next

हडपसर : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाºया प्रभागात अनेक ठिकाणची अतिक्रमणे हडपसर अतिक्रमण विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केली. प्रभाग क्रमांक २६ मधील महंमदवाडी येथील मुख्य चौकातील अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली. यामध्ये हॉटेल, पत्र्याचे शेड, दुकाने, पक्की बांधकामे आदी हटविण्यात आले.
या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त, अतिक्रमण विभागाच्या गाड्या, बिगारी, जेसीबी, मनपा अधिकारी, कर्मचारी असा मोठा फौजफाटा अतिक्रमणे काढताना दिसत होता.
हडपसर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण अधिकारी गणेश तारू यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली; तसेच नगर रस्त्यावरही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
महंमदवाडी येथील चौकात भाजपाचे विद्यमान नगरसेवक संजय घुले यांचे अनेक दिवसांपासून या चौकात संपर्क कार्यालय होते. नगरसेवक घुले यांनी नागरिकांच्या सोयीसाठी व रस्ता, चौकाचे रुंदीकरण व्हावे या चौकात सतत वाहतूककोंडी निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, स्वत:चे आॅफिस अतिक्रमण अधिकाºयांना पाडण्यास सांगितले. हडपसरचे अतिक्रमण अधिकारी गणेश तारू यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळातील हडपसर परिसरातील सर्वांत मोठी अतिक्रमण कारवाई ठरली. हडपसर क्षेत्रीय कार्यालय बिल्डिंगमधील अनेक दुकानांच्या बाहेर असलेले शेड, ओटे, बोर्ड आदी जेसीबीने काढण्यात आली. हडपसर भाजीमंडईजवळील, सोलापूर रस्त्यावरील अनेक ठिकाणची विविध प्रकारची अतिक्रमणे हटविण्यात आली.
हडपसर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाºया सर्व प्रभागात रस्त्यास, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे व फुटपाथवर, पथारीवाले, दुकानासमोरील बेकायदेशीर असलेले पत्र्याचे शेड, अतिक्रमणांवर यापुढेही जोरदार कारवाई करण्यात येणार आहे.
-गणेश तारू,
हडपसर अतिक्रमण अधिकारी

महंमदवाडी येथील चौकात माझे स्वत:चे अनेक दिवसांपासून संपर्क कार्यालय होते. मी जरी नगरसेवक असलो आणि आमची महापालिकेत सत्ता असली, तरी मी आॅफिस पाडण्यास विरोध केला नाही. नागरिकांच्या हितासाठी, रस्ता, चौक रुंदीकरण करण्यासाठी मी स्वत: अतिक्रमण अधिकारी यांना माझे आॅफिस काढण्यास सांगितले. नागरिकांनी वाहतुकीस अडथळा ठरेल असे अतिक्रमण करू नये.
- नगरसेवक संजय घुले

Web Title: Pune: Corporator's office flattened; Hatha on encroachment in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे