Pune Crime: क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगच्या गुंतवणुकीच्या बहाण्याने १४ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: April 6, 2024 06:22 PM2024-04-06T18:22:37+5:302024-04-06T18:23:11+5:30
याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे....
पुणे : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंढवा परिसरात राहणाऱ्या सुशील संजय लांडगे (वय ३१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ डिसेंबर ऑक्टोबर २०२३ ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना क्रिप्टो खरेदी-विक्री करण्यास सांगितले, असे करत एकूण १४ लाख १८ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील, असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निकम करीत आहेत.