मोठा खुलासा..! पुण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण दोन कोटींसाठी नव्हे तर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:51 IST2025-03-07T19:51:39+5:302025-03-07T19:51:55+5:30

दोन कोटींसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण ? पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

pune crime : If a diamond merchant was not kidnapped from Pune city for Rs 2 crore Financial difficulties | मोठा खुलासा..! पुण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण दोन कोटींसाठी नव्हे तर…

मोठा खुलासा..! पुण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण दोन कोटींसाठी नव्हे तर…

किरण शिंदे

पुणे - दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना बिबवेवाडी परिसरात घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, हे अपहरण खरे नसून व्यापाऱ्याने स्वतःचाच अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले आहे.  

नेमक काय घडले ?  

पुण्यातील हिरे व्यापारी तिथल शहा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या पत्नी आणि मुलासोबत होते. त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामासाठी कॅम्पला जात असल्याचे सांगून निघून गेले. काही वेळाने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. या कॉलवर "मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो," अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेतली.  

पोलिसांचा वेगवान तपास आणि धक्कादायक सत्य आले समोर  

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. व्यापाऱ्याचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळले, तिथेच त्यांची दुचाकीही सापडली. मात्र, सखोल चौकशीत तिथल शहा यांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले.

अपहरण प्रकरणातील तितल शहाकडे केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान ते म्हणाले, 'मला पुण्यातील दहा ते बारा लोकांनी व्याजाने पैसे दिले होते. ते व्याजाचे पैसे देणे न झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या फॅमिलीला किडनॅपिंगचा  खोटा कॉल करून, नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून घेतला, त्यानंतर रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई येथे गेले, तिथून पुढे बॉम्बे सेंट्रल इथे एक दिवस लॉजवर राहलो. तर खार वेस्ट मुंबई येथे लॉजवर दोन दिवस आणि  एक दिवस विलेपार्ले येथे राहिलो, सदर लोकांनी दिलेल्या त्रासामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचेही शहाने सांगितले. तरी, या प्रकरणी अधिक तपास करत आहोत .  

आर्थिक अडचणीतून बनाव?

व्यापारी तिथल शहा काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. कर्जाचा भार वाढल्याने त्यांनी बनावट अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, तिथल शहा सुखरूप घरी परतले असून, पोलीस त्यांच्याकडून अधिक चौकशी करत आहेत. हा प्रकरण आणखी मोठे गुंतागुंतीचे आहे का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: pune crime : If a diamond merchant was not kidnapped from Pune city for Rs 2 crore Financial difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.