Pune Crime : मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला जन्मठेप
By नम्रता फडणीस | Published: November 26, 2024 08:09 PM2024-11-26T20:09:15+5:302024-11-26T20:09:15+5:30
पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची ...
पुणे : प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे मित्राला जीवे ठार मारणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा आदेश दिला. सुशांत रमेश ओंबळे (वय 24, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड. मूळ ऱा. विठ्ठलवाडी, पौड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा आदेश दिला. अक्षय जोरी असे मृत्यू झालेल्या मित्राचे नाव आहे. ही घटना 10 जुलै 2018 रोजी पहाटे चारच्या सुमारास कोथरूड परिसरात घडली. ओंबळे व जोरी हे मित्र होते. ओंबळे याच्या प्रेमप्रकरणाची माहिती जोरी यांनी ओंबळे याच्या प्रेयसीच्या घरी दिली होती.
याकारणावरून त्याने बिअरची बाटली फोडून त्या काचेच्या आधारे जोरी याचा खून केला होता. याप्रकरणात, त्याला अटक करून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळी यांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावेळी, गुन्ह्यातील फिर्यादी,साक्षीदार व इतर आवश्यक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ओंबळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.