Pune Crime : गुंड टिपू पठाणसह साथीदारांवर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:59 IST2025-04-22T19:56:12+5:302025-04-22T19:59:22+5:30

पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती, तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

Pune Crime Mokka on gangster Tipu Pathan and his associates | Pune Crime : गुंड टिपू पठाणसह साथीदारांवर ‘मोक्का’

Pune Crime : गुंड टिपू पठाणसह साथीदारांवर ‘मोक्का’

पुणे : खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, खंडणी मागणे, धमकावून जमीन बळाकाविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या हडपसरमधील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांवर पुणेपोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

टिपू पठाण याची हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता. पठाण याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण करून समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित झाली होती. पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती, तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

दरम्यान, पठाण याच्यासह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचा प्रस्ताव काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिली.

यांच्यावर केली मोक्का कारवाई

रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (वय ३४), एजाज सत्तार पठाण (वय ३९), नदीम बाबर खान (वय ४१), सद्दाम सलीम पठाण (वय २९), एजाज युसूफ इनामदार-पटेल (वय ३३), इरफान नासीर शेख (वय २६), साजीद नदाफ (वय २६) सर्व रा. सय्यदनगर, हडपसर

लोणी काळभोरमधील टोळीलाही ‘मोक्का’

लोणी काळभोर परिसरात दहशत माजविणारा व विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड फिरोज महंमद शेख (वय २९), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०), अस्लम अन्वर शेख, आदित्य प्रल्हाद काळाणे (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावरही पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. गेल्या चार महिन्यात परिमंडळ पाचमधील सहा गुंड टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी ‘मोक्का’ कारवाई केली आहे.

Web Title: Pune Crime Mokka on gangster Tipu Pathan and his associates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.