'माझी लेक मैत्रीणींसोबत शनिवारवाडा पाहायला गेलेली...' १६ वर्षांची मुलगी बेपत्ता, अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:19 IST2025-04-13T13:17:26+5:302025-04-13T13:19:23+5:30
मला माहिती मिळताच मी मुलीला विचारणा केली. आणि रागावलो त्यानंतर नाराज होऊन घराबाहेर गेली.

'माझी लेक मैत्रीणींसोबत शनिवारवाडा पाहायला गेलेली...' १६ वर्षांची मुलगी बेपत्ता, अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशात आज सिंहगड रोड परिसरातील १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी शाळेत न जाता आपल्या मैत्रीणींसोबत शनिवारवाडा येथे गेली होती. यावरून वडिलांनी राहवले असता ती घराबाहेर निघाली. त्यानंतर घरी आली नाही त्यामुळे या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिकच्या माहितीनुसार, या सर्व प्रकाराबाबत वडिलांनी सिंहगड पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, माझी लेक शाळेत न जाता आपल्या मैत्रीणींसोबत शनिवारवाडा येथे गेली होती. याबाबत मला माहिती मिळताच मी मुलीला विचारणा केली. आणि रागावलो त्यानंतर नाराज होऊन घराबाहेर गेली. ती घराबाहेरून कडी लावून कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेली. आम्हाला शंका आहे की तिचे अपहरण झाले असावे. दरम्यान या प्रकरणात अज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय आणि महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी भेट दिली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी काही माहिती असल्यास तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.