बाकांची झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:30 AM2018-12-24T02:30:37+5:302018-12-24T02:30:46+5:30

पुणे महापालिकेचे शहरात नागरिकांसाठी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव जनतेच्या कररूपी निधीतून बसविण्यात येणाऱ्या येरवडा येथील ‘शोभिवंत बाकां’ची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.

Pune crime news | बाकांची झाली चोरी

बाकांची झाली चोरी

Next

विमाननगर : पुणे महापालिकेचे शहरात नागरिकांसाठी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव जनतेच्या कररूपी निधीतून बसविण्यात येणाऱ्या येरवडा येथील ‘शोभिवंत बाकां’ची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी महापालिकेच्या शोभिवंत बाकांची चोरी करणाºया भामट्याचा शोध घेण्याची मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येरवड्यातील आर. टी. ओ. फुलेनगर कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारक उद्यानाबाहेर असणाºया फुटपाथवरील ग्रॅनाईटचे दोन शोभिवंत बाक गेल्या काही महिन्यांपासून जागेवर नसल्याची चर्चा सुरू होती. २०११-१२ च्या निधीतून तत्कालीन नगरसेवकाने वॉर्डात ग्रॅनाईटची शोभिवंत बाक बसविले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील फुटपाथची दुरुस्ती करण्यात आली. या वेळी हुतात्मा स्मारक उद्यानाच्या सुशोभीकरणाचे कामदेखील सुरू होते. फुटपाथच्या दुरुस्तीनंतरच या ठिकाणी असणारे ग्रॅनाईटचे बाक दिसेनासे झाले. नियमितपणे उद्यानात येणाºया व स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांच्यामार्फत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष महेश शिर्के व मनोज ठोकळ यांनी याबाबतीत शहानिशा करून जागेवर असणारे ग्रॅनाईटचे बाक खरोखरच अदृश्य झाल्याची खातरजमा केली. काम पूर्ण झाल्यानंतर ते कसे नाहीसे झाले?

न्नागरिकांच्या सोयीसाठी शहरभर लोखंडी, लाकडी, सिमेंट-काँक्रिटसह शोभिवंत ग्रॅनाईटचे बाक लाखो रुपये खर्च करून बसविले जातात. मात्र त्याच्या कोणत्याही नोेंदी महापालिका प्रशासन ठेवत नाहीत. लोकप्रतिनिधी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, ठेकेदार व अधिकारी या सर्वांच्या निदर्शनातून अशी गंभीर बाब दुर्लक्षित केली जाते. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.
न्महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्यावतीने फुटपाथवरून चोरी गेलेल्या शोभिवंत बाकांचा तपास करून या जनतेच्या करातून उभारण्यात येणाºया साहित्याची चोरी करणाºया ‘भामट्या’ला जेरबंद करण्याची मागणी थेट पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: Pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे