पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:56 AM2024-10-04T09:56:42+5:302024-10-04T09:59:52+5:30
Pune Crime News : पुण्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन दिवसापूर्वी एका स्कूलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. यावेळी तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्या तरुणीचे आणि मित्राचे फोटो काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीला कारमध्ये बसवून कार येवलेवाडीजवळ घेऊन गेले. या ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले. यानंतर आरोपींनी तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पसार झाले.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत २१ वर्षीय तरुणी गेली होती. यावेळी या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नुकतेच दोन दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून एका तरुणाने अपहरण केले होते. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपीने तरुणीला सोडून पळून गेला होता, त्यानंतर आता पुन्हा बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.
संबंधित पीडित मुलगी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणारा आहे .सदर दोघे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. गुरुवारी रात्री सदर दोघे दुचाकी वर बोपदेव घाट या ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे .
या घाटात रात्रीच्यावेळी कोणच नसते, यामुळे कोणही मदतीला नव्हते. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .