पुण्यात पबमध्ये तरुणींना धक्काबुक्की करत महिला बाऊन्सरला शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:04 IST2025-03-25T12:01:37+5:302025-03-25T12:04:19+5:30

येरवडा परिसरातील एका पबमध्ये ही घटना घडली

pune crime news Female bouncer abused for pushing young women in pub in Pune | पुण्यात पबमध्ये तरुणींना धक्काबुक्की करत महिला बाऊन्सरला शिवीगाळ

पुण्यात पबमध्ये तरुणींना धक्काबुक्की करत महिला बाऊन्सरला शिवीगाळ

- किरण शिंदे 

पुणेपुण्यातील येरवडा परिसरात पबमध्ये डान्स करत असताना तरुणींना धक्का दिला. तर त्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला बाउन्सरला शिवीगाळ केली. येरवडा परिसरातील एका पबमध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेश दादाभाऊ घावटे (वय ३४, रा. मु. पो. अण्णापूर, ता. शिरुर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ३२ वर्षीय महिला बाऊन्सरने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, येरवड्यातील पबमध्ये शनिवारी रात्री डान्स फ्लोअरवर तरुण-तरुणी डान्स करत होते. तेव्हा हे दोघेही त्याठिकाणी डान्स करत होते. डान्स करताना बाजूच्या तरुणीला धक्का बसला. त्यांच्या डान्समुळे इतरांना धक्का बसत असल्याचे पाहून महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला डान्स करण्यास सांगितले. यावेळी दोघांनी महिला बाऊन्सरशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करुन विनयभंग केला. दोघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.

Web Title: pune crime news Female bouncer abused for pushing young women in pub in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.