पोर्शे अपघात प्रकरण : 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:14 IST2025-03-27T10:13:33+5:302025-03-27T10:14:04+5:30

अल्पवयीन कारचालकने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती.

pune crime news Porsche accident case: Will 'those' two police officers be dismissed? | पोर्शे अपघात प्रकरण : 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार ? 

पोर्शे अपघात प्रकरण : 'ते' दोन पोलिस अधिकारी बडतर्फ होणार ? 

किरण शिंदे

पुणे - पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. याच अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होते. आणि आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे. कारण या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे. 
 
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कर्तव्यास असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानूसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परत जात असताना अल्पवयीन कारचालकने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या गर्भ श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून  त्यातील आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कशा कामाला लागल्या होत्या हे तेव्हा समोर आले होते. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजन अद्यापही कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळू दिलेला नाही. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

Web Title: pune crime news Porsche accident case: Will 'those' two police officers be dismissed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.