गुंड टिपू पठाणची पोलिसांकडून धिंड; खंडणी मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:06 IST2025-04-13T12:05:42+5:302025-04-13T12:06:21+5:30

पुणे : हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि ...

pune crime Police scold gangster Tipu Pathan; appeal to file complaint if extortion demanded | गुंड टिपू पठाणची पोलिसांकडून धिंड; खंडणी मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

गुंड टिपू पठाणची पोलिसांकडून धिंड; खंडणी मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

पुणेहडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सय्यदनगर भागात रिझवान उर्फ टिपू पठाणची दहशत आहे. पठाण याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना नुकतीच घडली होती. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओही व्हायरल केला होता. जमीन बळकावल्याप्रकरणी संबंधित महिलेने काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली होती.

या प्रकरणी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार, नदीम बाबर खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पठाण याच्यासह साथीदारांची सय्यदनगर भागात धिंड काढली. पोलिस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पठाण याने नागरिकांना धमकावून खंडणी उकळणे, तसेच जमीन बळकावल्याचे प्रकार केल्यास तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक पाटील यांनी केले.

Web Title: pune crime Police scold gangster Tipu Pathan; appeal to file complaint if extortion demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.