Pune Crime: महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा

By नम्रता फडणीस | Published: December 9, 2023 06:13 PM2023-12-09T18:13:34+5:302023-12-09T18:14:09+5:30

दोन महिलांसह एच. आर. विभाग प्रमुखावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune Crime: Suicide of female employee, case against HR head and two | Pune Crime: महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा

Pune Crime: महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : नामांकित रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एच. आर. प्रमुखासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिताली आचार्य (वय ४२, रा. कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मिताली यांनी रुग्णालयामध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुचिता योगेश आचार्य (वय ७८. रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह एच. आर. विभाग प्रमुखावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुचिता आचार्य यांची सून मिताली आचार्य या मागील १७ वर्षांपासून रुग्णालयामध्ये कामाला होत्या. आरोपी महिला तिला किरकोळ कारणावरून स्टाफसमोर टोचून बोलत असत. याबाबत मितालीने एच. आर. प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तिला अपमानास्पद वागणूक देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यानंतर मिताली आचार्य या नोकरीसाठी लेखी अर्ज घेऊन गेल्या असता, एच. आर.ने ‘मी कुणाला पण नोकरी देईन पण तुला नोकरी देणार नाही,’ असे बोलून मितालीच्या अंगावर अर्ज फेकून दिला होता. यामुळे मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Pune Crime: Suicide of female employee, case against HR head and two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.