Pune Crime: 'तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस', कोयत्याने हल्ला; दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:02 AM2023-07-26T10:02:20+5:302023-07-26T10:02:34+5:30

पुण्यात कोयता गँग कमी होण्याचे नाव घेत नसून आता शाळकरी मुलांकडेही कोयता आढळून आला आहे

Pune Crime Why do you tease me after school attacked by crocodile Both injured | Pune Crime: 'तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस', कोयत्याने हल्ला; दोघे जखमी

Pune Crime: 'तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस', कोयत्याने हल्ला; दोघे जखमी

googlenewsNext

हडपसर: कोयता गँग कमी होण्याचे नाव घेत नाही, कोयत्याचे लोण आता शाळकरींमध्ये पोचले आहे. तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, ही घटना मंगळवारी (दि. 25 जुलै, 2023) हडपसर पांढरे मळा येथे घडली. 

पोलिसांनी सांगितले की, शाळा सुटल्यानंतर हल्लेखोर विद्यार्थी व त्याच्या मित्रांनी अल्पवयीन मित्राला तू मला शाळा सुटल्यावर का चिडवतोस असा जाब विचारत कोयत्याने हल्ला केला. यावेळी आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला. या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Web Title: Pune Crime Why do you tease me after school attacked by crocodile Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.