कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Updated: March 18, 2025 20:10 IST2025-03-18T20:09:08+5:302025-03-18T20:10:07+5:30
या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : शिवजंयतीनिमित्त सिंहगडावरुन ज्योत आणण्याकरीता कोल फायर उडवत जाताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टोळक्याच्या अंगावर पडल्याने टोळक्याने तरुणाला लाकडी बांबूने मारहाण केली. मात्र या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. कर्वेनगर येथील विकास चौकात १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता हा प्रकार घडला.
याबाबत तेजस अंकुश राजे (वय २२, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण (दोघे रा. कर्वेनगर) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिल्लीवाला याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कॉलनीतील मित्रांसोबत दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती निमित्त ज्योत आणण्याकरिता सिंहगड येथे दि. १७ मार्च रोजी मध्यरात्री हे सर्व मित्र मोटारसायकलवरुन निघाले होते. फिर्यादी हे दुचाकीस्वार मित्राच्या मागे बसून कोलफायर उडवत चालले होते. वाटेत सुवर्ण बाल तरुण मित्र मंडळाजवळ त्यांच्या कॉलनीत राहणारे अक्षय दिल्लीवाला, ओमकार निम्हण व त्यांचे दोन मित्र थांबले होते. त्यांच्या अंगावर कोलफायर उडाले. तरीही त्याकडे लक्ष न देता ते सर्व पुढे निघून गेल्याने पाठीमागून अक्षय दिल्लीवाला व त्याचे तिघे साथीदार आले. त्यांनी फिर्यादीला हातातील बांबुने मारण्यास सुरुवात केली.
सोबत असलेल्या ओमकार निम्हण व दोन साथीदारांनी हाताने मारहाण केली. फिर्यादी सोबत असलेल्या मित्रांनी भांडणे सोडविली. फिर्यादीच्या वडिलांना कळल्यावर घटनास्थळी गेल्यावर् त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्यांनी फिर्यादीच्या वडिलांनाही शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस हवालदार भंडलकर तपास करीत आहेत.