पुणे : दहा महिन्यांत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:51 AM2017-11-17T05:51:26+5:302017-11-17T05:52:07+5:30
मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
पुणे : मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. ताप, हिवताप, चिकुनगुनिया, काला अशा आजारांमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असल्याचे चित्र आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले, की साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरडा दिवस
पाळवा. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धुराळणी, फवारणीस प्राधान्य द्यावे.
जानेवारी ते आॅक्टोबरच्या कालखंडात सर्वाधिक डेंग्यूच्या रोगाने थैमान घातले आहे. विविध तालुक्यांतील १६ ठिकाणी डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे १२० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर संशयित ९ जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. तर चिकुनगुनियाचा ५ ठिकाणी उद्रेक झाला आहे. त्यामुळे ८१ नागरिकांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यांत चिकुनगुनियाची साथ वाढल्यामुळे ८१ जणांना रोगाची लागण झाली होती. त्यामुळे