Pune: फोटो शूटला नकार; महिलेने दिली अत्याचाराची केस करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:52 PM2024-11-17T15:52:34+5:302024-11-17T15:52:50+5:30

आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी दिली.

Pune: Denial of photo shoot; The woman threatened to file a case of torture | Pune: फोटो शूटला नकार; महिलेने दिली अत्याचाराची केस करण्याची धमकी

Pune: फोटो शूटला नकार; महिलेने दिली अत्याचाराची केस करण्याची धमकी

पुणे : आता लगेच फोटो शूट होणार नाही आपण नंतर करू असे म्हणताच महिलेने ४३ वर्षीय फोटोग्राफरला बलात्काराची केस करण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्वप्नील वसंत रास्ते (४३, बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुराधा मुक्तेश्वर पाटील (रा. नऱ्हे, मुळ रा. सोलापूर) या महिलेविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराधा ही ६ नोव्हेंबर रोजी स्वप्नील रास्ते यांच्या बिबवेवाडीतील फोटो स्टुडिओत गेली होती. तिला फोटो शूट करायचे होते. त्यावर रास्ते यांनी लगेच फोटो शूट होणार नाही, आपण नंतर करू असे सांगितले. यावर आरोपीने त्यांना तुझ्यावर बलात्काराची केस करेन अशी धमकी दिली. तसेच रास्ते यांच्याकडे पैशांची मागणी केली.

फिर्यादींनी घाबरून तिला २० हजार रोख दिले. यानंतरही अनुराधा हिने पुन्हा पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. तसेच पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओत येऊन तुला मारले तर नावाची अनुराधा पाटील नाही अशी धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत या करत आहेत.

Web Title: Pune: Denial of photo shoot; The woman threatened to file a case of torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.