पुणे : शिवसैनिकांचा सुटकेचा नि:श्वास, भाजपाला नमवण्याचा निर्धार; नवी कार्यकारिणी भिडणार जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:20 AM2018-01-24T06:20:14+5:302018-01-24T06:20:35+5:30

अनेक वर्षांची स्वबळाची मागणी मान्य झाल्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, आता भारतीय जनता पार्टीला दाखवून देऊ असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. नव्या कार्यकारिणीसह आता भाजपाला भिडणार

Pune: Determination of Shiv Sena's freedom to release, BJP decides to humiliate; The new executive will climb | पुणे : शिवसैनिकांचा सुटकेचा नि:श्वास, भाजपाला नमवण्याचा निर्धार; नवी कार्यकारिणी भिडणार जोरात

पुणे : शिवसैनिकांचा सुटकेचा नि:श्वास, भाजपाला नमवण्याचा निर्धार; नवी कार्यकारिणी भिडणार जोरात

googlenewsNext

पुणे : अनेक वर्षांची स्वबळाची मागणी मान्य झाल्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, आता भारतीय जनता पार्टीला दाखवून देऊ असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. नव्या कार्यकारिणीसह आता भाजपाला भिडणार असे सांगण्यात येत आहे.
खासदार तसेच आठ विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. मात्र स्वतंत्रपणे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तसेच त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची शहरात एक वेगळी स्वतंत्र मतपेढी पक्की असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात वाढ करण्यासाठी अंग झटकून काम करण्याचे आवाहन नव्या शहरप्रमुखांनी शिवसैनिकांना केले आहे.
खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दोन महिन्यांपूर्वी पुणे शहरात प्रथमच शहरप्रमुखपदाच्या दोन जागा निर्माण केल्या आहेत. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांवर असलेले भाजपाचे वर्चस्व मोडून काढण्याची पूर्वतयारीच त्यातून
सुरू झाली आहे. दोन्ही शहरप्रमुखपदांवर माजी आमदार देण्यामागेही तोच विचार असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर या दोघांकडे प्रत्येकी ४ विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत.
त्यांनी थेट शाखाप्रमुखांनाच शहर कार्यकारिणीत स्थान दिले असून, जुन्या-नव्या शिवसैनिकांना सक्रिय करण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत.
शहरातील लोकसभेची
लढत अवघड-
विधानसभा मतदारसंघ लढवणे
फारसे अवघड नसले तरी लोकसभा लढवणे मात्र शिवसेनेला अवघड जाईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. लोकसभेसाठी शिवसेनेकडे तगडा उमेदवारच नाही.
माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, आमदार डॉ. नीलम गो-हे किंवा मग शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे एखादा उद्योगपती एवढ्याच
नावांची चर्चा सध्या आहे.
पक्षप्रमुखांचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुण्यात आम्ही नव्याने सर्व बांधणी सुरू केली आहे. निवडणुकांना अद्याप बराच वेळ आहे. मागील वेळची लाट आता ओसरू लागली आहे हे लक्षात घेता आम्ही त्यांना नक्कीच जेरीस आणू. जनहिताच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आंदोलन करून आम्ही त्यांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढू, असा विश्वास आहे.
- चंद्रकांत मोकाटे,
शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: Pune: Determination of Shiv Sena's freedom to release, BJP decides to humiliate; The new executive will climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.