जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:40 PM2019-08-01T17:40:00+5:302019-08-01T17:44:40+5:30

मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली होती...

pune district Bank will give a 10 lakhs cash credit : 15 thousands teacher get benifits | जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

Next
ठळक मुद्देपगाराच्या 20 पट कर्जाची मागणी

बारामती : जिल्ह्यातील शिक्षकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १० लाख रुपये कॅश क्रेडिट मंजूर केल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
सातव्या वेतन आयोगामुळे शिक्षकांच्या पगारात वाढ झाल्याने कॅश क्रेडिट मर्यादेत वाढ करण्याची शिक्षक संघाची मागणी होती.

 मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा दिलीप वळसे पाटील व रमेश थोरात यांनी केली होती. त्यानंतर वर्षभरातच शिक्षकांना पुन्हा दुसऱ्यांदा 10 लाखापर्यंत वाढ मिळाली आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील १५,००० कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
जिल्ह्यातील प्राथमिक , माध्यमिक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समिती मधील कर्मचारी यांना वाढीव कजार्चा लाभ होणार आहे. कॅश क्रेडिट घेतल्यानंतर वेतनातून मुद्दल न घेता फक्त व्याजाची कपात होत असल्याने या कजार्साठी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे.
...........
यावर्षी अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेने 15 टक्के दराने लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वषीर्चे 7 व यावर्षीचे 8 टक्के मिळून 15 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. शिक्षक पतसंस्थासाठी ही जवळपास 50 कोटींची रक्कम आहे.- रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, पुणे

........................
पगाराच्या 20 पट कर्जाची मागणी
10 लाख कॅश क्रेडिटचा सर्व शिक्षकांना लाभ मिळण्यासाठी पगाराच्या 20 पट कर्ज मंजूर करण्याची मागणी शिक्षक संघाने केली. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन रमेश थोरात यांनी दिल्याची माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली.

Web Title: pune district Bank will give a 10 lakhs cash credit : 15 thousands teacher get benifits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.