अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात पुणे जिल्हा सर्वात मागे, साताऱ्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:33+5:302021-02-17T04:16:33+5:30

पुणे : लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील केवळ ७ टक्के ...

Pune district lags behind Satara in immunization of essential staff | अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात पुणे जिल्हा सर्वात मागे, साताऱ्याची आघाडी

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणात पुणे जिल्हा सर्वात मागे, साताऱ्याची आघाडी

Next

पुणे : लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील केवळ ७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राज्यातील लसीकरणात पुणे जिल्हा सर्वात मागे आहे. सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. साताऱ्यात आतापर्यंत ८८ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुणे जिल्ह्यातील लसीकरण ५० टक्के पूर्ण झाले आहे. नोंदणी केलेल्या १,१९,००४ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५९,७१५ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. ५९,२८९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. ६५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ४३ टक्के लसीकरण झाले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत पुणे ग्रामीणमध्ये २२,३१६, पुणे शहरात २७,४०० तर पिंपरी चिंचवडमध्ये ११,१०४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

सर्वात कमी लसीकरण :

जिल्हाअत्यावश्यक कर्मचारी गाठलेले उद्दिष्ट टक्केउर्वरित कर्मचारी

पुणे ८५३७१ ६३३५ ७ ७९०३६

औरंगाबाद १६१४४ १८८१ १२ १४२६३

कोल्हापूर १३३८० १९२१ १४ ११४५९

---

सर्वाधिक लसीकरण :

जिल्हाअत्यावश्यक कर्मचारी गाठलेले उद्दिष्ट टक्केउर्वरित कर्मचारी

सातारा ११९०४ १०४३५ ८८ १४६९

उस्मानाबाद ३२८३ २०११ ६१ १२७२

अकोला ६७०६ ३७०० ५५ ३००६

Web Title: Pune district lags behind Satara in immunization of essential staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.