राज्यात पुणे जिल्हा थकबाकीत पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:10+5:302021-02-15T04:11:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात वीजबिलांपोटी वर्षाकाठी एरव्ही ७० कोटींची असलेली थकबाकी कोरोना आपत्ती काळात म्हणजे १ ...

Pune district ranks first in arrears in the state | राज्यात पुणे जिल्हा थकबाकीत पहिल्या क्रमांकावर

राज्यात पुणे जिल्हा थकबाकीत पहिल्या क्रमांकावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यात वीजबिलांपोटी वर्षाकाठी एरव्ही ७० कोटींची असलेली थकबाकी कोरोना आपत्ती काळात म्हणजे १ एप्रिल ते आजपर्यंत १ हजार ८१ कोटी रुपयांवर पोहचली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील (पुणे, पिंपरी चिंचवड शहर मिळून) ४ लाख, ७ हजार ४५२ घरगुती ग्राहकांनी १ एप्रिल, २०२० पासून १४ एप्रिल,२०२१ पर्यंत विजबिलाचा एकही रुपया भरलेला नाही.

‘कोरोना’च्या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी हजार कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे सर्वच गोष्टींत पुढे असलेल्या पुण्याने येथेही पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये (मुंबई वगळता) पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक थकबाकी आहे. ही थकबाकी आजमितीला १ हजार ८१ कोटी ४१ लाख रुपयांवर गेली आहे.

विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकूण ४ लाख ८२ हजार ८०८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी १ एप्रिल, २०२० पासून आजपर्यंत एक रुपयाही भरलेला नसून, ही एकूण थकबाकी रक्कम ६२५ कोटी रुपये इतकी आहे. एक रुपयाही थकबाकी न भरणाऱ्यामध्ये सर्वाधिक ग्राहक हे घरगुती असून, ही संख्या ४ लाख ७ हजार ४५२ इतकी असून, त्यांच्याकडे ३९१ कोटी रुपये. तर वाणिज्यिक वीज ग्राहकांची संख्या ६६ हजार ६३४ इतकी असून, त्यांच्याकडे १६८ कोटी ८ लाख रुपये. याचबरोबर औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या ८ हजार ५५२ इतकी असून, त्यांच्याकडे ६४ कोटी ९ लाख रुपये थकबाकी आहे.

-----

Web Title: Pune district ranks first in arrears in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.