पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:52+5:302021-08-28T04:13:52+5:30
कुस्तीगीर निवड चाचणीत खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान असणे बंधनकारक आहे. २००३ जन्मतारीख ...
कुस्तीगीर निवड चाचणीत खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान असणे बंधनकारक आहे. २००३ जन्मतारीख असणारे कुस्तीगीर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र देऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेत मुलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६,९२,९७, १२५ किलो, मुलांच्या ग्रीकोरोमन प्रकारात ५५, ६०,६३,६७, ७२, ७७, ८२, ८७,९७, १३० किलो वजनी गट असणार आहे. तर मुलींच्या लढती ५०,५३, ५५,५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलो वजनी गटाच्या खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून निवड झालेले कुस्तीगीर राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत.