सातबारा डाऊनलोडिंगमध्ये राज्यात पुणे जिल्हा आवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:58+5:302021-03-06T04:10:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या दैनंदिन व्यवहारात डिजिटल सातबारा आता अविभाज्य घटक बनत आहे. दिवसेंदिवस डिजिटल ...

Pune district in the state in Satbara downloading | सातबारा डाऊनलोडिंगमध्ये राज्यात पुणे जिल्हा आवल

सातबारा डाऊनलोडिंगमध्ये राज्यात पुणे जिल्हा आवल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या दैनंदिन व्यवहारात डिजिटल सातबारा आता अविभाज्य घटक बनत आहे. दिवसेंदिवस डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढत आहे. डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. गेल्या सव्वा वर्षात एकट्या पुणे जिल्ह्यात ५ लाख ७१ हजार ४९२ डिजिटल सातबारे डाऊनलोड करण्यात आले आहेत. तर १ लाख ७ हजार ७९३ आठ ‘अ’ डाऊनलोड केले आहेत.

सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’ चा उतारा सहज व हेलपाट्याविना मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प सुरू होऊन सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यात राज्यात सर्वच जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात पुण्यानंतर औरंगाबाद, सोलापूर, अकोला, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांचा अनुक्रमे नंबर लागतो.

राज्याचे प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, राज्यात सन २००३ पासून संगणकीयकृत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व जिल्ह्यातील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण सन २००२-०३ पासून सुरू झाले. सन २०१०-११ पर्यंत ते जिल्हा स्तरावरच संगणकीकृत केले जात होते.

महसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण केले. तर सन २०१५-१६ पासून हे सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख ऑनलाइन केले. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील सुमारे २ कोटी ५३ लाख गाव नमुना नं. ७/१२ ऑनलाइन करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे सर्व उपजिल्हाधिकारी यांनी अहोरात्र काम करून हे अशक्य वाटणारे काम पूर्णत्वाकडे नेले आहे.

-------

राज्यात सर्वाधिक सातबारे डाऊनलोड करणारे जिल्हे

जिल्हा डाऊनलोड सातबारा डाऊनलोड ८अ

पुणे ५७१४९२ १०७७९३

औरंगाबाद ३०६६३० ७७८६०

सोलापूर २९४९५५ ५८९३४

अकोला २६१९३६ ५८६९३

अहमदनगर २२७७२७ ५५१६७

Web Title: Pune district in the state in Satbara downloading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.