‘रासप’च्या आधाराशिवाय पुण्याला महापौर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:08+5:302021-02-11T04:12:08+5:30
पुणे : “राष्ट्रीय समाज पक्षा (रासप) ला अनेक राजकीय अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तरीही यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३ ...
पुणे : “राष्ट्रीय समाज पक्षा (रासप) ला अनेक राजकीय अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तरीही यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार सदस्य निवडून आले. आगामी महापालिका निवडणूकीत रासप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या आधाराशिवाय पुण्याचा महापौर होणार नाही,” असा दावा रासपचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केला.
बुधवारी (दि.१०) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोलतोडे, माऊली सलगर, रवींद्र चासकर, बाळासाहेब कोकरे, अॅड. संजन माने, शहराध्यक्ष विनायक रुपनवर, अंकुश देवडकर, महिला आघाडीच्या सविता जोशी, सुनीता किर्वे आदी यावेळी उपस्थित होते.
गुट्टे म्हणाले की, रासपची संघटनात्मक बांधणी पूर्ण झालेली आहे. चांगले आणि निवडून येणारे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. आमच्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही.