"चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या "; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 04:33 PM2024-06-24T16:33:51+5:302024-06-24T16:46:47+5:30

Chandrakant Patil : पुण्यात ड्रग्ज प्रकरणानंतर मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्या घटना घडल्या नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत.

Pune Drug cases were going well with Chandrakant Patil blessings Amol Mitkari serious allegation | "चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या "; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

"चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या "; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Pune Drug Case : पुण्यात काही महिन्यांपूर्वी कोट्यवधि रुपयांचे ड्रग्ज सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर पुण्याच्या कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणानंतर प्रशासनाने शहरातील पब्ज आणि बारवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या कारवाईचा धाक राहिला नसल्याचे रविवारी समोर आली. एफसी रोडवरील एका पबमध्ये काही तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली. मात्र आता या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने पलटवार करत गंभीर आरोप केला आहे.

एफसी रोडवरील एका पबमधील पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या घटनेवरुन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच पुण्याचे माजी पालकमंत्री यांनी एक विधान केलं होतं. मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरुन आता आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत, असं म्हटलं होतं. त्यानंतर सारवासारव करताना पाटील यांनी , "अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना?" असं म्हटलं.

अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर

“चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत,” असे म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, फर्ग्युसन रोडवरील पबचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याआधी पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दोन अमलदारांचं निलंब केलं होतं. यासह पबचा चालक मालक संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठलं कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, देवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर, मोहन राजू गायवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
 

Web Title: Pune Drug cases were going well with Chandrakant Patil blessings Amol Mitkari serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.