Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 01:48 PM2023-07-23T13:48:18+5:302023-07-23T13:49:06+5:30

पुणे शहरात दहशतवादी कृत्ये करण्यासंबंधीची तयारी ते करीत असल्याचा पोलिसांना संशय

Pune: Expert in making bombs! Shocking information from terrorists caught in Pune | Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर

Pune: बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट! पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती समोर

googlenewsNext

पुणे : शहरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेले दोघे दहशतवादी हे प्रत्यक्षात बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ड्रोनच्या सहाय्याने शहरातील संवेदनशील ठिकाणाचे चित्रीकरण करण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गुन्ह्याचा तपास शनिवारी दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनीही या दोघांकडे तपास केला.

कोथरुड भागातून दुचाकी चोरण्याच्या तयारीत मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्याकडील लॅपटॉपमधील काही फाइल पोलिसांनी उघडून पाहिल्यावर त्यांच्याविषयी सर्व प्रथम संशय आला. त्यात देशविघातक कृत्याबाबतचे साहित्य आढळून आले. तसेच बॉम्ब बनविण्याबाबतच्या अनेक बाबी त्यात आढळून आल्या. शहरात दहशतवादी कृत्ये करण्यासंबंधीची तयारी ते करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

त्यानंतर त्यांची माहिती एटीएसला देण्यात आली. त्यातूनच मग हे दोघे एनआयएच्या एका गुन्ह्यात फरारी असल्याचे आढळून आले. गेल्या चार दिवसांत त्यांच्याकडे केलेल्या तपासात ते चांगले बॉम्ब एक्सपर्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यासाठी राजस्थानमधील गुन्ह्यात सापडलेले बॉम्बचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार होते. परंतु, त्या अगोदरच नाकाबंदीत ते पोलिसांच्या हाती लागले होते.

खान आणि साकी यांच्याकडून पांढऱ्या रंगाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, गोळ्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून दहशतवादी कोंढवा भागात वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी घरझडतीत एक काडतूस जप्त केले असून, पिस्तूल सापडले नाही. साकी आणि खान आयसीस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित आहेत.

Web Title: Pune: Expert in making bombs! Shocking information from terrorists caught in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.