Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:03 AM2021-03-28T02:03:05+5:302021-03-28T06:07:27+5:30

पुण्यातील कॅम्प भागात प्रसिद्ध असलेल्या कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण मार्केटच खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले.

Pune Fire: 500 shops burnt down in Pune fire; Billions lost and another officer killed | Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू 

Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू 

Next

पुणे : शहरातील प्रसिद्ध कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली होती. शनिवारी पहाटे ५ पर्यंत ही आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला. या आगीत ५०० हून अधिक दुकानांची राख झाली असून, कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. 

आग लागल्यानंतर रात्री अग्निशमन दलाचे बंब, महापालिका, कॅन्टोनमेंटचे बंब आणि वॉटर टँकरद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत दुकानांमधील सर्व माल जळून खाक झाला आहे.  फॅशन स्ट्रीट हे व्यापारी संकुल एम.जी. रोड व ईस्ट स्ट्रीट रोडच्या दरम्यान दोन एकर परिसरात अतिशय दाटीवाटीने वसलेले आहे. २०१८ साली पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाने केलेल्या ऑडिटमध्ये तिन्ही फायर ब्रिगेडने धोकादायक व्यापारी संकुल म्हणून या फॅशन स्ट्रीटचा अहवाल दिला होता. पण त्यावर बोर्डाने काहीच कार्यवाही केली नाही.   

अधिकाऱ्याचा मृत्यू
अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. आग विझवण्यासाठीच्या मोहिमेत पुढे होते ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे. कर्मचाऱ्यांना दोन तासांत पुन्हा कामावर परत येतो, असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. 

 

Web Title: Pune Fire: 500 shops burnt down in Pune fire; Billions lost and another officer killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग