Pune Fire News : अग्रवाल कॉलनी येथे भीषण आग; ६ विद्युत मीटर जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:18 PM2021-03-30T12:18:58+5:302021-03-30T12:22:53+5:30
Fire Breaks Out at Bhawani Peth Agarwal Colony : सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील सर्व राहवासी घाबरून गेले.
भवानी पेठ येथील अग्रवाल कॉलनीमधील ७७९ हिरा बिल्डिंग या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटरला आग लागून मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये ६ मीटर जळून अक्षरशः कोळसा झाले. सकाळी ९ च्या दरम्यान हिरा बिल्डिंग मधील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सोसायटीच्या मीटरला आग लागून सर्व मीटर जळून कोळसा झाले.
सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या आगीमुळे येथील सर्व राहवासी घाबरून गेले. पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे. अग्रवाल कॉलनीच्या मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाकलेल्या लोखंडी खांबामुळे फायर ब्रिगेडच्या गाडीला आता येण्यास विलंब झाला, त्यामुळे या गाडीला कॅन्टोन्मेंट कामगार वसाहत या ठिकाणाहून वळसा घालत अतिशय निमुळत्या रस्त्याने आत यावं लागलं
आडव्या टाकलेल्या लोखंडी खांबामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आत येण्यास उशीर झाला. येथून रुग्णवाहिका देखील आत येत नाही त्यामुळे सदरचा खांब त्वरित काढून टाकावा अन्यात भविष्यात जर आत मोठी दुर्घटना घडली तर खूप नुकसान होईल.
- सतीश दरोडे (रहिवासी - हिरा बिल्डिंग)
सोसायटीच्या फॉल्टी मीटरमुळे आग लागली असावी. त्यामुळे सहाच्या सहा मीटर जाळून खाक झाले. १५ मिनिटांत आग विझवण्यात आली. येथे उभ्या असलेली वाहने आणि लोखंडी खांब यामुळे गाडी आत येण्यास त्रास झाला.
- किसन गोगावले (तांडेल) पुणे मनपा फायर ब्रिगेड