पुणे : देवाची उरळी येथे प्लास्टिकच्या गोदामात अग्नितांडव, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 07:25 AM2017-12-20T07:25:22+5:302017-12-20T07:47:53+5:30
देवाची उरळी येथे प्लास्टिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे - देवाची उरळी येथे प्लास्टिक-भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. लकी एन्टरप्राईजेस असे गोदामाचे नाव आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मंतरवाडीतील ही घटना आहे. रात्री उशीरा 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीमध्ये दोन दुचाकी व एक मालवाहतूक ट्रक ही वाहनं जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमध्ये जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गोदामाच्या मालकानं धसका घेतला व त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हडपसर अग्निशमन दलातील अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी ही माहिती 'लोकमत'ला दिलेली आहे. मुस्तफा युसूफ खान असे गोदामाच्या मालकाचं नाव आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.