पुणे गोळीबार, चौघांना अटक
By admin | Published: July 5, 2017 04:09 AM2017-07-05T04:09:00+5:302017-07-05T04:09:00+5:30
पिंपळे गुरव येथे बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (जि. पुणे): पिंपळे गुरव येथे बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाची प्रमुख सूत्रधार पुण्यातील माजी नगरसेवकाची मुलगी आदिती गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र ती काहीच माहिती देत नव्हती. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अन्य चार आरोपींना जेरबंद केले. त्यांना न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदिती गायकवाड (२२, औंध, पुणे) हिच्यासह सौरभ शिंदे (२०, नवी सांगवी, पुणे), प्रणव गावडे (१९, चिखली प्राधिकरण, पुणे), आशुतोष ऊर्फ बंटी मापारे (१९, धानोरी, पुणे) यांचा समावेश आहे. शेलार यांना जिवे मारण्याचा कट रचल्याची, तसेच त्यासाठी पाच लाखांची सुपारी घेतल्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे.