पुणे : शहरात चार नवीन वाहन तपासणी, ट्रॅक परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:47 AM2018-01-25T05:47:24+5:302018-01-25T05:47:43+5:30

वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

Pune: Four new inspections in the city, decision on the track transport minister's meeting | पुणे : शहरात चार नवीन वाहन तपासणी, ट्रॅक परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : शहरात चार नवीन वाहन तपासणी, ट्रॅक परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Next

पुणे : वाहन योग्यता तपासणीसाठी शहर आणि परिसरात चार नवीन चाचणी मार्ग (टेस्ट ट्रॅक) उभारण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथे, तर अवजड वाहनांची दिवे घाटात चाचणी होईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पालकमंत्री बापट, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, बापू भावे, प्रदीप भालेराव, राजन जुनवणे, रावसाहेब कदम, बाबा कांबळे उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘दिवे घाटातील चाचाणी मार्गासाठी आवश्यक १.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन चाचणी मार्गांसाठी योग्य जागांचा शोध घेऊन त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. स्कूल बस व महाराष्ट्र परिवहनच्या बस नोंदणीला प्राधान्य देण्यात येईल. रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापण्यासाठी कामगारमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल.
पुण्यात दररोज ७०० जणांची तपासणी-
पुण्यात दररोज पाचशे ते ७०० वाहने तपासणीसाठी येत असतात. त्याचा यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी दहा अधिकारी सहा महिन्यांसाठी पुणे परिवहन विभागात देण्यात येणार असून, सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
वाहनांच्या आनलाईन नोंदणी संदर्भात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील वाहतुकीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
रिक्षांसाठी अ‍ॅप-
ओला, उबेर यासारख्या कंपन्यांमुळे रिक्षाचालकांना मोठा फटका बसू लागला आहे. चारचाकी वाहनांसह रिक्षांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इतर रिक्षाचालकांचा व्यवसाय कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता ओला, उबेरला टक्कर देण्यासाठी अन्य रिक्षांसाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
आरटीओच्या मार्गदर्शनाखाली हे अ‍ॅप तयार केले जाणार आहे. या अ‍ॅपवरून प्रवाशांना रिक्षा बुक करणे शक्य होईल. या अ‍ॅपमुळे रिक्षाचालकांकडून प्रवासी नाकारण्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच नागरिकांनाही चांगली सेवा मिळावी, असे अपेक्षित आहे.

Web Title: Pune: Four new inspections in the city, decision on the track transport minister's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.