पुणे: नवीन चप्पल आणली नाही म्हणून मित्राने डोक्यात दगड घालून केली हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 04:35 PM2017-10-02T16:35:47+5:302017-10-02T16:37:05+5:30

राम घरी आला तेव्हा दत्ताने मी सांगितलेली नवीन चप्पल तू का नाही आणली ? अशी विचारणा केली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यातून...

Pune: A friend did not bring new slippers and laid stones on his head | पुणे: नवीन चप्पल आणली नाही म्हणून मित्राने डोक्यात दगड घालून केली हत्या  

पुणे: नवीन चप्पल आणली नाही म्हणून मित्राने डोक्यात दगड घालून केली हत्या  

Next

पिंपरी : नवीन चप्पल का नाही आणली ,या कारणावरून आरोपीने सहका-याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना 24 सप्टेंबरला चिंचवड येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. राम स्नेही (वय ३२ ) या तरूणाच्या खून प्रकरणी रामदूत बर्सिंग राजपूत उर्फ दत्ता मच्छीवाला (वय ४६ रा. मोहनगाव, मध्यप्रदेश) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने ४ आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता मच्छीवाला व राम स्नेही हे चिंचवड परिसरात सेंटरींगचे काम करत होते. खून झाला त्या रात्री दोघेही दारू प्याले. दोघेही एकाच खोलीत राहत होते.राम घरी आला तेव्हा दत्ताने मी सांगितलेली नवीन चप्पल तू का नाही आणली ? अशी विचारणा केली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यातून आरोपीने रामच्या  बाजुला पडलेला दगड रामच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झाल्याने रामचा मृत्यू झाला. रामच्या खुनाचा तपास करीत असताना, चिंचवड पोलिसांना अडचणी आल्या. या दोघांना ओळखणारे कोणीच नव्हते. मुळचे परप्रांतिय परंतू काही दिवसांपुर्वीच शहरात आलेल्या या दोघांविषयी कोणाला काहीच माहिती नव्हती. मृत रामच्या  खिशात आधारकार्ड होते. त्याच आधारावर पोलिसांनी त्याच्या नातेवाइ्कांशी संपर्क साधुन मृत व्यकती राम सनेही असल्याची खात्री करून घेतली. मोबाईल लोकेशन ट्रेस करून मुंबईपर्यंत आरोपीचा मागोवा घेतला. तो तेथून उत्तरप्रदेशला गेला असल्याचे समजले. चिंचवड पोलिसांनी विशेष पथक नेमून त्याला उत्तरप्रदेश येथून अटक केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक गुन्हे विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष डिगे, पोलीस नाईक स्वप्नील शेलार, सुधाकर आवताडे, विजकुमार आखाडे, ऋषिकेश पाटील, महिला पोलीस कांचन घवले, रुपाली पुरीगोसावी, पोलीस शिपाई चंद्रकांत गडदे, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, सचिन ढवळे, नितीन राठोड,राहूल मिसाळ, विशाल आंबटवार यांनी केली.

Web Title: Pune: A friend did not bring new slippers and laid stones on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.