पुणे गणेश फेस्टिव्हल यंदा ऑनलाईन पार पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:54+5:302021-09-10T04:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘पुणे गणेश फेस्टिव्हल’ यंदाचा गणेशोत्सव पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उत्सवात सामाजिक भान असावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘पुणे गणेश फेस्टिव्हल’ यंदाचा गणेशोत्सव पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या उत्सवात सामाजिक भान असावे, म्हणून यंदा एक जनजागृती उपक्रम राबवणार आहे. गणपती मंडळ, कार्यकर्ता आणि गणेशभक्त यांच्यातील दुव्याचे कार्य करत असताना डिजिटल गणपती मंडळ आणि बाप्पाचा कार्यकर्ता हे उपक्रम होणार आहेत, अशी माहिती पुणे गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल नहार यांनी दिली.
१० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘पुणे गणेश फेस्टिव्हल डिजिटल मोहत्सव’ व www.puneganeshfestival.com संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर, दुपारी २ वाजता पुणे गणेश फेस्टिव्हल डिजिटल महोत्सव कासव गणपती प्राणप्रतिष्ठापना दुपारी २ वाजता मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते, उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
नहार म्हणाले, की ‘पुणे गणेश फेस्टिव्हल’ उपक्रम गेली १० वर्षे अखंडितपणे कार्यरत आहे. पुण्याचा गणेशोत्सव जगात पोहोचवण्यासाठी काम करत आहे. सोशल मीडियावर गणेशभक्तांची पसंती खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पुणे गणेश फेस्टिव्हलचे फॉलोअर्स १ लाख ५९ हजारच्या पुढे आणि १ लाख लाईक्सचा टप्पा नुकताच पार केला.