पुणे गणेशोत्सव! महापालिकेत ८ ऑगस्टला बैठक; विसर्जन रथांच्या उंचीबाबत चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 11:14 AM2022-08-04T11:14:36+5:302022-08-04T11:14:47+5:30

बैठक पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी ३ वाजता हाेईल.

Pune Ganesha festival Municipal Corporation meeting on August 8 The height of immersion chariots will be discussed | पुणे गणेशोत्सव! महापालिकेत ८ ऑगस्टला बैठक; विसर्जन रथांच्या उंचीबाबत चर्चा होणार

पुणे गणेशोत्सव! महापालिकेत ८ ऑगस्टला बैठक; विसर्जन रथांच्या उंचीबाबत चर्चा होणार

googlenewsNext

पुणे : कोरोना आपत्तीमुळे दोन वर्षे गणेशाेत्सव होऊ शकला नाही. यंदा हा उत्सव जल्लाेषात साजरा हाेणार असल्याने शहरात आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध प्रलंबित विषयांबाबत सोमवारी (दि. ८) महापालिका, पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी ३ वाजता हाेईल.

दरम्यान, महापालिकेकडून गणेशोत्सवानिमित्त १२ जुलै रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली होती. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी मांडवासह विविध गोष्टींसाठी परवाने घ्यावे लागतात. मंडळांच्या मांडवाची जागा व अन्य गोष्टी वर्षानुवर्ष कायम असतात. त्यामुळे मंडळांच्या जय गणेश व्यासपीठातर्फे दरवर्षीऐवजी एकदम पाच वर्षांचे परवाने दिले जावेत, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी पुणे दौऱ्यादरम्यान गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. या वेळी शिंदे यांनी सार्वजनिक मंडळांना एकदाच पाच वर्षांचा परवाना देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर शेवटच्या पाच दिवसात रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

दरवर्षी विसर्जन मिरवणूक मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होते. यंदा तिथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पूल व त्यानुसार विसर्जन रथांची उंची, रनिंग मांडव, कमानी आदीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

Web Title: Pune Ganesha festival Municipal Corporation meeting on August 8 The height of immersion chariots will be discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.