पुण्याचा कचरा आदिवासींच्या मुळावर

By Admin | Published: February 14, 2015 10:51 PM2015-02-14T22:51:54+5:302015-02-14T22:51:54+5:30

येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली.

Pune garbage on tribals | पुण्याचा कचरा आदिवासींच्या मुळावर

पुण्याचा कचरा आदिवासींच्या मुळावर

googlenewsNext

गोहे बुद्रूकची उभेवाडी उंच डोंगरावर वसलेली छोटीशी वस्ती आहे़ पुण्यापासून १०० किलोमीटर अंतर आहे़ या ठिकाणी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास सलग २५ ते ३० गाडया आल्या़ येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता प्लास्टिक व खाणीने भरलेले ढिग त्यांना दिसले़
ग्रामस्थांनी चौकशी केली असता, शेतीसाठी खत म्हणून महानगरपालिका कचरा देते. गोहे येथे रहाणाऱ्या व पुणे महानगरपालिकेत कामाला असणाऱ्या मोघाजी उभे यांनी खतासाठी हा कचरा टाकायला लावला आहे़ त्यांनी दाखविलेल्या जागेनुसार पुणे महानगरपालिकेच्या गाडयांनी येथे कचरा खाली केला़ मोघाजी उभे महानगरपलिकेत सॅनेटरी इन्स्पेक्टर असून दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेची गाडी येऊन पहाणी करून गेली होती, असे ग्रामस्थ सिताराम जोशी, रामचंद्र गेंगजे, वामन जोशी, इंदुबाई गेंगजे, किसन गेंगजे, सितराम गेंगजे, रमेश गेंगजे, दत्तात्रय गेंगजे यांनी सांगितले़
ग्रामपंचायतची परवानगी न घेता कोणालाही न विचारता हा कचरा पुणे महानगरपालिकेने टाकला आहे़ हा कचरा पुणे महानगरपालिकेने घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगर पालिकेवर मोर्चा आणतील, हा कचरा महानगरपालिके बाहेर आणून टाकला जाईल, तसेच पुन्हा गाडया येऊ नयेत यासाठी येथे पोहचणाऱ्या रस्त्याला रात्री दगडी लावून ठेवल्या जातील व एक गाडी देखील जाग्यावर येऊ देणार नसल्याचे उपसभापती सुभाष तळपे यांनी सांगितले़

४या कचऱ्यातून खत कसे होऊ शकते हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन दाखवावे़ हे प्लास्टिक जनावऱ्यांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतील़ हा कचरा रानात पसरले, प्लास्टिकमुळे झाडे उगवणार नाहीत, पर्यावरणाचा ऱ्हास होईल़
४शहरीकरणामध्ये आमच्या आदिवासींचा बळी घेऊ नका, काबड कष्ट करून आदिवासी शेतकरी जगतात, मानव निमित्त आपत्ती आमच्यावर नको, खाजगी जागेत जरी कोणी कचरा टाकत असले तरी आम्ही कचरा टाकू देणार नाही़
४ पुन्हा महानगरपालिकेची माणसे व गाडया येथे आल्या तर त्यांनी परत नीट जाऊ देणार नाही, असे सिताराम जोशी यांनी सांगितले़ गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.

४पुणे महानगरपालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महानगरपालिकेने त्वरीत घेऊन जावा व यापुढे महानगरपालिकेंनी आदिवासी पट्टयात कुठेही कचरा टाके नये अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
४आज गुपचूप २५ गाडया कचरा आणून टाकल्या उद्या महापालिका १00 गाडया कचरा आणून टाकू शकते, ग्रामस्थ स्वच्छ बसणार नाहीत. पुण्याचा कचरा आम्हाला नको, पुणे महापालिकेने कचऱ्याचा प्रश्न स्वतंत्रपणे सोडवावा, त्यांच्या आम्हाला देणेघेणे नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेबाबत पुणे महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून कचरा उचलण्यास सांगितले आहे. हा कचरा उद्या उचलण्यात येणार आहे. गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या कृतीमुळे ग्रामस्थांमध्येही संताप पसरला आहे़ पुणे महापालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महापालिकेने त्वरित घेऊन जावा व यापुढे महापालिकेने आदिवासी पट्ट्यात कुठेही कचरा टाकल्यास आंदोलन करण्यात येईल.
- दिलीप वळसे-पाटील,
आमदार, आंबेगाव तालुका.

शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ओला कचरा टाकला आहे. ओल्या कचऱ्याऐवजी प्लॅस्टिकयुक्त कचरा टाकला असेल, तर तो परत उचलण्यात येईल, असे ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे.
- सुरेश जगताप,
अतिरिक्त आयुक्त, कचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका

Web Title: Pune garbage on tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.