Pune: पाषाणला सर्वाधिक गारठा, दोन-तीन दिवस थंडी कायम राहणार

By श्रीकिशन काळे | Published: December 25, 2023 03:46 PM2023-12-25T15:46:57+5:302023-12-25T15:48:10+5:30

अजून दोन-तीन दिवस असाच गारठा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे...

Pune: Hail most likely, cold will continue for two-three days | Pune: पाषाणला सर्वाधिक गारठा, दोन-तीन दिवस थंडी कायम राहणार

Pune: पाषाणला सर्वाधिक गारठा, दोन-तीन दिवस थंडी कायम राहणार

पुणे : शहरात किमान तापमानात घट झाल्याने पाषाणला १०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. शिवाजीनगर भागातही ११.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आकाश निरभ्र असले तरी देखील हवेत गारठा जाणवत आहे. अजून दोन-तीन दिवस असाच गारठा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यामध्ये वाढ झाली आहे. किमान तापमान १० अंशाच्याही खाली गेले आहे. रविवारी राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान पाषाणाला ९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आज किंचिंत वाढ होऊन ते १०.१ आहे. येत्या २८ डिसेंबरपर्यंत असेच तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ३० डिसेंबरनंतर मात्र ढगाळ वातावरण असेल. पहाटे धुके पडत असल्याने नागरिक त्याचा आनंद लुटत आहेत. अनेकजण थंडीमध्ये टेकडीवर, गार्डनमध्ये फिरायला जात असल्याचे दिसून येत आहे. वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क या परिसरातील किमान तापमान मात्र १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले.

शहरातील किमान तापमान
पाषाण : १०.१
हवेली : १०.६
एनडीए : ११.१
शिवाजीनगर : ११.७
कोरेगाव पार्क : १६.३
मगरपट्टा : १७.८
वडगावशेरी : १८.६

Web Title: Pune: Hail most likely, cold will continue for two-three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.