पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:16 AM2022-12-12T11:16:34+5:302022-12-12T11:16:54+5:30

धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे.

Pune... has poor air quality, followed by Mumbai; Including in polluted cities | पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश

पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईने प्रदूषणाबाबत दिल्लीला मागे टाकले असतानाच आता प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचे नावदेखील जोडले गेले आहे. रविवारी पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदविण्यात आला असून, मुंबईची हवा तर सातत्याने अत्यंत खराब व खराब या श्रेणीत नोंदविण्यात येत आहे. 
दुसरीकडे वातावरणात उठलेल्या धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरा  
वायू प्रदूषणासाठी वाहने जबाबदार आहेत. वायू प्रदूषणास कारणीभूत एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे वाहनातून निघणारी ज्वलनशील हवा होय. यावर उपाय म्हणून वाहनांमध्ये रेट्रोफिट उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसवली जाऊ शकतात. जी हवेत फेकल्या जाणाऱ्या विषारी घटकांपैकी ७० ते ९० टक्के घटक कमी करण्यासाठी एक्झॉस्ट उत्सर्जन कमी करण्यास आणि फिल्टर करण्यास मदत करतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर भर द्यावा, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

प्रदूषणाची कारणे 
n धूलिकणांमुळे प्रदूषण नोंदविण्यात येत आहे.
n वाऱ्याचा वेग कमी आहे. त्यामुळे धूलिकण वाहून जात नाहीत.
n हिवाळ्यात धूलिकण जास्त वर जात नाहीत. जमिनीवर राहतात. 
आरोग्य परिणाम 
धूलिकणांचा आरोग्यावर थोडाफार परिणाम होतो. मात्र, दिल्लीसारखी स्थिती नाही. कारण दिल्ली अतिथंड प्रदेश आहे. मुंबई तेवढी थंड नाही.

हवेची कसून तपासणी करा 
औद्योगिकीकरण आणि शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असल्याने वायू प्रदूषणामुळे हवेतील विषारी घटक प्राणघातक पातळीपर्यंत वाढले आहेत. देशातील हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी ठेवण्यासाठी भारताला किमान ४ हजार एअर मॉनिटरिंग स्टेशन्सची आवश्यकता आहे.

Web Title: Pune... has poor air quality, followed by Mumbai; Including in polluted cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.