पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:18 AM2024-10-03T09:18:22+5:302024-10-03T11:30:04+5:30

Pune Helicopter Accident : पुणे हेलिकॉप्टर अपघातात बुधवारी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune helicopter crash two ex IAF pilots and former navy engineer died | पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान

Pune Helicopter Crash : पुण्यात बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेनं खळबळ उडाली. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पुण्याच्या बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. महिन्याभरापूर्वी मुळशीमध्येही अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. मात्र यावेळी तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. आता या अपघातात मृत पावलेल्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या बावधनमध्ये बुधवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला.  पु्ण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या आणि त्याचा अपघात झाला. उड्डाणानंतर हेलिकॉप्टर बराच वेळ आकाशात घिरट्या घेत होतं. शेवटी हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं आणि त्याने पेट घेतला. 
हेलिकॉप्टर अपघातात भारतीय वायुसेनेचे  दोन माजी वैमानिक आणि एक निवृत्त नौदल अभियंत्याचा मृत्यू झाला. तिघेही अनुभवी विमान व्यावसायिक होते. हेरिटेज एव्हिएशन या खाजगी दिल्ली स्थित विमान कंपनीच्या मालकीचे ऑगस्टा १०९ हेलिकॉप्टरने ते प्रवास करत होते.

या अपघातात गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत या तिघांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरचे वैमानिक परमजीत सिंग (६२) आणि सहवैमानिक जी.के. पिल्लई (५७) हे होते. दोघेही भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी होते. तर अभियंता प्रीतम कुमार भारद्वाज (५३) हे माजी भारतीय नौदलाचे अधिकारी होते. तीन अत्यंत कुशल वैमानिकांच्या मृत्यूनंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे पुरावे गोळा करण्यासाठी विमान अपघात तपास ब्युरोचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

सुनील तटकरे करणार होते प्रवास

या हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रवास करणार होते. सुनील तटकरे हे मंगळवारी हेलिकॉप्टरने पुण्यावरून बीडमधील परळीला गेले होते. त्यानंतर ते मुंबईला परतले. त्यानंतर ते बुधवारी मुंबईवरून पुण्याला जाणार होते. त्यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात होतं. मात्र काही वेळातच त्याचा अपघात झाला. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. मी आज त्या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होतो, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
 

Web Title: Pune helicopter crash two ex IAF pilots and former navy engineer died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.